गोंदिया, चंद्रपूर या रेल्वे 28 सप्टेंबर पासून सुरू होणार |
गोंदिया:- रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोंदिया ते चंद्रपूर रेल्वे मार्गावर बल्लारशाह मेमू आणि बालाघाट मार्गावर कांतीगी डेमू 28 सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली आहे. या बातमीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
24 सप्टेंबर रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूरच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकाच्या कार्यालयाकडून पत्र जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.या पत्रातील माहितीनुसार, गोंदिया ते बल्लारशाहकडे धावणाऱ्या MEMU पॅसेंजर ट्रेन क्रमांक 08802 28 सप्टेंबरपासून सकाळी 7.40 वाजता नियोजित वेळेवर सुटेल, तर ट्रेन क्रमांक 08801 बल्लारशाहहून निघून रात्री 8.10 वाजता गोंदियाला पोहोचेल.
हेही वाचा: कोरची: दुकानदार महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला अखेर अटक
त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 07703 गोंदिया-कटंगी डेमू 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता कटंगीहून निघेल, तर काटंगीहून सुटणारी ट्रेन क्रमांक 07804 कटंगी-गोंदिया दुपारी 2.05 वाजता गोंदियाला पोहोचेल. गोंदिया-कटंगी-बालाघाट डेमू पॅसेंजर ट्रेन नं .07807 गोंदियाहून 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता नियोजित वेळेत सुटेल; परतीची ट्रेन क्र. 07808 कटंगी-बालाघाट-गोंदिया ट्रेन 11.30 वाजता गोंदियाला पोहोचेल.
तुमसर ते तिरोडी दरम्यान धावणारी डेमू ट्रेन देखील 2 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन तुमसरहून तिरोडीला सकाळी 4.15 वाजता सुटेल, तर तीरोडीहून सकाळी 7.15 वाजता परत येईल.