आरोग्य मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, अभाविप मागणी
गडचिरोली:- कोणतीही पूर्वसूचना नसताना रात्री झोपण्याच्या वेळात झोपलेल्या राज्य सरकारला अचानक जाग येते आणि आरोग्य विभागाच्या होऊ घातलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा अध्यादेश जाहीर केला जातो या निद्रीस्त सरकारला बेरोजगार तरुणांचा काही देणं-घेणं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे त्यामुळे आरोग्य विभागाचे मंत्री यांची सर्वतोपरी जबाबदारी स्वीकारून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोलीच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा: Gondia News: अखेर गोंदिया,चंद्रपूर रेल्वे 28 सप्टेंबर पासून सुरू होणार
या घटनेच्या निषेधार्थ गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला व धक्काबुक्की देणे या संपूर्ण घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोलीच्या वतीने निषेध व्यक्त केल्या जात अभविप गडचिरोली च्या कार्यकर्त्यांना यावेळी अटक करण्यात आली यामध्ये विदर्भ प्रदेश सहमंत्री अभिषेक देवर , जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर ,विभाग संघटन मंत्री शक्ती केराम हे होते.
तर उपस्थिती मध्ये नगर मंत्री जयेश ठाकरे, नगर सहमंत्री तुषार चुधरी, हिरालाल नूरुती, अनिल पोटे, राजू गाइन, मयूर खेवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते