मुलगी भाव देत नाही आणि पटत नाही.. खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र..
Chandrapur News: मुली भाव देत नाहीत म्हणून नाराज तरुणाने थेट आमदारानांच पत्र लिहिलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील तरुणाचे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एकही पटेना, असं पठ्ठ्याने थेट आमदारांना पत्रात लिहिल्याचं समोर आलं आहे. राजूरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. तर आमदार धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे.
हेही वाचा:
- चंद्रपूर शहराच्या एका हनुमान मंदिराच्या मागे नग्नावस्थेत विवाहित महिला व युवक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली
- Chandrapur News: अन्नावाचून तडफडून माय लेकींचा मृत्यू; चंद्रपूर हळहळलं
- चंद्रपूर हादरला! 'प्यार तूने क्या किया', एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीवर चाकूनं सपासप वार; प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं
पत्रात नेमकं काय? :
प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा
विषय - गर्लफ्रेंड न पटण्या बाबत
अर्जदार - भूषण जांबुवंत राठोड
महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेंड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज फेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेंड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा
आपला प्रेमी
भूषण जांबुवंत राठोड