सागवान लाकुड जप्त वन अधिकारी यांची कार्यवाही
Chandrapur News: शहरातील जूनोना चौक परिसरातील अभिमन्यु मेश्राम या फर्नीचर व्यावसायिकाच्या घरी वनविभागाच्या फिरते पथकाने धाड टाकली असता विना परवाना 12-13 सागवान चे कट साईज लाकुड व त्यापासून तयार केलेला टी टेबल, खिड़की हस्तगत करण्यात आली, मालाची किंमत लाखा च्या घरात आहे.
सोबतच बाबुपेठ येथील वंदना मानुसमारे यांचे कडून 4 कट साईज सागवान जप्त करण्यात आले, तसेच भास्कर गहुकर या व्यावसायिक कडे सुद्धा कारवाई करण्यात आली. कारवाई विभागीय वन अधिकारी दक्षता तथा प्रशासकीय अधिकारी सतीश चोपडे यांनी चंद्रपुर वनवीभाग मोबाईल स्कॉट तसेच वनपाल व वनरक्षकांसह पहाटे केली.
हेही वाचा: ब्रम्हपुरी तालुक्यात भारत बंद निमित्त सर्व पक्षीय एकत्र येऊन विशाल बैल बंडी व ट्रॅक्टर मोर्चा
सर्व फर्नीचर व्यावसायिकांनी विभागीय कार्यालयाकडून आवक जावक रजिस्टर नोंदणी व बिल बुक जमा करून नियमाने कार्य करावे असे आवाहन विभागीय दक्षता वन अधिकारी श्री चोपडे यांनी केले आहे.