शेतकरी युवकाचा खड्यात पडून मृत्यू
पोंभूर्णा:- शेतात काम करीत असताना पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात पाय घसरून पडल्याने शेतकरी युवकाचा बुडून मृत्यू झाला.ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. नरेंद्र बुरांडे (२२) रा. चेक पोंभूर्णा असे मृतकाचे नाव आहे.
हेही वाचा: वैनगंगा नदीच्या पात्रात युवकाने मारली उडी
सदर घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मर्ग दाखल करण्यात आले.
पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार तुळशिराम कुळमेथे करीत आहेत.