जायकवाडीचे धरणाचे 27 दरवाजे चार फुटांनी उघडले |
औरंगाबाद : राज्यात मुसळधार पावसामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अति बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे चार फुटांनी उघडले असून धरणातून एकूण 89 हजार क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचे इशारा देण्यात आले आहे. ( 27 gates of Jayakwadi dam opened )
हेही वाचा: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार तर 11 वर्षीय मुलावर अत्याचार
दरम्यान जायकवाडी धरण हे या वर्षीदेखील तब्बल 98.40 टक्के भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून नदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.