नेवजाबाई हितकारिणी (NH)
ब्रम्हपुरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माद्यामिक शिक्षण मंडळाने अंतर्गत गुणांच्या आधारे मंगळवारला 12वी परीक्षेचा निकाल 3 आगस्टला घोषित केला. मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी 12वीचा निकाल भरपूर प्रमाणात लागलं आहे. यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील नेवजाबाई हितकारिणी (NH ) महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. याबद्दल महाविद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे विज्ञान (Science) शाखेतील सर्व विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नेवजाबाई हितकारिणीचे (NH ) संस्था सचिव अशोक भैया, अध्यक्ष स्नेहलताताई भैया, प्राचार्य डॉ.एन.एस.कोकोडे, उपप्राचार्य डॉ.धनंजय गहाणे, पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर, प्रा.राहुल मोहुर्ले, प्रा.किशोर भूत्तमवार, प्रा.परकरवार तसेच प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.