![]() |
राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा इशारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे |
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधने शिथिल करणार आहोत. पण कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. तर काही देशात कोरोना विषाणू वाढतच आहे. आपल्याकडे कोरोनाची साखळी वाढू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा. (Maharashtra Lockdown)
स्वातंत्र्यदिनानंतर 16 ऑगस्टपासून राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 'कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता हा चिंतेचा विषय बनत जात आहे. म्हणून लागू असलेल्या निर्बंधांवर शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचे प्रमाण ठरवून हि शिथिलता दिली आहे. 'त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध नागरिकांना पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या जास्त गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो,' असं ते म्हणाले.
उपहार गृहांना आता आपण रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. उपहारगृह बारमध्ये गेल्यावर कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपहारगृह बारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील. लशीचे दोन डोस घेतलेलेच कर्मचारी उपाहारगृहात काम करू शकतील.
मास्कचा वापर बंधनकारक. वातानुकुलित उपहारगृह वा बार असल्यास, वायुविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Maharashtra Lockdown)