गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे उघडले |
भंडारा:- पावसाच्या दिर्घ विश्रांतीनंतर दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. गोसेधरणाच्या (gosikhurd dam) पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वैनगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणाची पातळी कायम ठेवण्यासाठी गोसेधरणाचे 23 गेट अर्धा मिटरने उघडण्यात आले आहे. धरणामधून 2540 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून दर तासी 160 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 449 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. 2-3 दिवसांपासून दमदार व समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. (23 doors of gosikhurd dam open due to heavy rain)
पावसाळा अर्धा होऊन देखील जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला होता. पावसाने दडी मारल्यामुळे धान पिकासह अन्य पिके करपू लागले होते. रोवणी झालेल्या शेतजमिनीला मेगा पडल्या होत्या. झालेला खर्च वाया जाणार की काय अशी शंका शेतकरी वर्तवित होता. धान पिक वाचविण्यासाठी धडपड करीत होता. अशातच दिर्घ विश्रांतीनंतर दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती. यामुळे धान पिकासह अन्य पिकांना नवसजिवनी मिळाली असून शेतकरी सुखावला आहे. संततधार पावसामुळे तलाव व प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. नदी नाल्यांना पूर येऊन ओसंडून वाहत आहेत.
वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गोसेधरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी आज गोसेधरणाचे 23 दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले. धरणातून 2540 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होऊन दर तासाला 160 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.