विकास सेवाव्रती वृंद अभियानांतर्गत कोकण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची भेट
Palghar: नर्सिंह गोविंदराव वर्तक इंग्लिश हायस्कूल (NGV) व ज्युनियर कॉलेज, श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी आणि पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विकास सेवाव्रती वृंद अभियानांतर्गत कोकणातील पूरग्रस्तांना अन्न-धान्याची भेट पोहचविण्यात आली. तसेच सॅनिटरी पॅड, महिलांचे कपडे, बिसलेरी पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. सदर भेट पोहचविण्याकामी विरार ब्लॉक काँग्रेसने अथक प्रयत्न केले. विकास सेवाव्रती वृंद अभियानाला करारी मिलचे खालीद करारी यांचे बहुमोल योगदान लाभले. विरार ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन उबाळे यांनी मदतरुप संस्थांचे आभार व्यक्त केले आहेत.
नर्सिंह गोविंदराव वर्तक इंग्लिश हायस्कूल (NGV) व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सारिका रावत आणि श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी (CBSE) च्या मुख्याध्यापिका रंजना कोळवणकर यांच्या पुढाकाराने तसेच शिक्षकवृंद जितेंद्र राऊत, प्रशांत पाटील, सचिन वैती, प्रसाद दांडेकर इ. यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मोलाचे सहकार्य दिले.