अखेर नाशिकच्या 'त्या' शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल |
नाशिक जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्या त लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासह प्राथमिक शिक्षक आणि शासकीय चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय चालक ज्ञानेश्वर येवले यांना अटक केली असून शिक्षणाधिकारी वैशाली वीर थोड्याच वेळात चौकशीसाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात होणार हजर होणार आहेत.