भद्रावतीत आढळला डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण
भद्रावती: भद्रावती शहरातील सुमठाणा परिसरात डेल्टा प्लस व्हेरिएंट प्रकारचा पहिला रुग्ण आढळल्या माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. मनिष सिंग यांनी दिली. मात्र, या रुग्णांची प्रकृती चांगली असून, या रुग्णापासून इतर कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.
सावधगिरी बाळगून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करणे सुरु असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. १६ जुलैला घेण्यात आलेल्या नमूना पुण्याच्या संबंधित प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर तपासणीमध्ये सदर महिला बाधित असल्याचे आढळून आले होते.