Nagbhid Suicide News |
Nagbhid Suicide News: नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत चिंधीचक येथील इसम चार दिवसा आधी बेपत्ता होता. आज त्याचा शव त्याच्याच शेतात सडलेल्या अवस्थेत सापडून त्या इसमाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दिवाकर कवडू चौधरी (वय - ६५) रा. चिंधीचक असे मृतकाचे नाव आहे. तो चार पाच दिवसा पासून बेपत्ता होता. आज मृतकाचा मुलगा शेतावर गेले असता शेतामध्ये दुर्गंधी येऊ लागली.
- हेही वाचा: सावली तालुक्यात वाघाच्या हल्यात मेंढपाळ गंभीर जखमी; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
- हेही वाचा: जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक, रस्ते अपघातावर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे
दरम्यान दुर्गंधी च्या दिशेने मुलगा गेला असता त्याला त्याच्या वडिलाचे शव सडलेल्या अवस्थेत झाडाखाली पडून दिसले. तसेच झाडाला दोरी अटकलेली होती. त्यामुळे वडिलाने आत्महत्या केल्याचा अंदाज घेऊन नागभीड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा व शवविच्छेदन करून शव कुटूंबाला देण्यात आले. मृतकाला पत्नी दोन मुली व चार मुलं असा परिवार असून पुढील तपास सुरु आहे.