Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांची पातळी सामान्य
Gadchiroli: काल मुसळधार पाऊस कोसळला असला तरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी सामान्य असल्याचे जिल्हा आपत्ती प्राधिकरण व्यवस्थापनाने कळविले आहे.
वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ३३ गेट बंद असून पॉवर हाऊस मधून १६० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वैनगंगा नदीची पाणी पातळी पवनी, देसाईगंज, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य आहे.
चिचडोह बॅरेजचे ३८ पैकी ३८ गेट उघडलेले असून ७७८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वर्धा नदीवरील निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ३१ गेट बंद असूनविसर्ग निरंक आहे. वर्धा नदीची पाणी पातळी बामणी (बल्हारशा) व सिरपूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.
प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव व टेकला सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य आहे.
गोदावरी नदीवरील मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी १२ गेट सुरु असून ५१९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.
इंद्रावती तसेच पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सामान्य आहे.