गडचिरोली व वडसा युवक काँग्रेस तर्फे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात सायकल यात्रा |
गडचिरोली: केंद्रातील मोदी सरकारने सर्व सामान्य जनतेला अडचणीत आणायच्या सपाट लावलेला आहे मागील 7 वर्षांत पेट्रोल,डिझेल,गॅस व जीवनावश्यक वस्तू चे दर गगनाला भिडले आहे.त्याचं विरोध करण्यासाठी युवक काँग्रेस च्या वतीने सायकल यात्रा काढून केंद्र शासनाचे निषेध करण्यात येणार आहे या रॅली चे नेतृत्व अखिल भारतीय युवक काँग्रेस सचिव मा.विजय सिंग जी व जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात होणार आहे.
हेही वाचा: दहावी बोर्डाचा निकाल उद्या 1 वाजता जाहीर; निकाल कसे पाहायचं
वडसा तालुक्यातील युवक काँग्रेस ,अल्पसंख्याक काँग्रेस सेल, अनुसूचित जाती विभाग,सेवादल,महिला काँग्रेस, एन एस यु आय सोशल मिडिया काँग्रेस कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित राहावे असे आव्हान युवक आरमोरी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे ,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकू बावणे,शेहजाद भाई शेख प्रदेश सचिव लतीपभाई रिजवी जिल्हा अध्यक्षअल्पसंख्याक,तालुका अध्यक्ष विलास ढोरे,युवक महासचिव कमलेश बारस्कर ,युवक महासचिव पंकज चहांदे यांनी केले आहे.
- दि-16/07/2021
- वेळ सकाळी -11.00 वा
- स्थळ-युवक काँग्रेस कार्यालय वडसा