७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार |
Nagpur Crime News: दहावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार बुधवारी समोर आला.प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्याने ही घटना चव्हाट्यावर आली. अखेर पोलिसांनी अल्पवयीन मुलाची बाल न्याय मंडळामार्फत रिमांड होममध्ये रवानगी केली. यशोधरानगर ठाण्यांतर्गत ही लाजीरवाणी घटना चव्हाट्यावर आली आहे. अत्याचार झालेली पिडीत मुलगी पहिल्या वर्गात शिकते तर या चिमुरडीवर अत्याचार करणारा मुलगा हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. दोन्ही कुटुंबात नातेसंबंध असल्याने त्यांच्यात घरोबाही आहे. (७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार)
हेही वाचा: अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन प्राचार्याने केलं तिला विनयभंग
12 जुलैला या मुलाने चॉकलेटचे आमिष मुलीला घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. आपल्या कृत्याचा बोभाटा होण्याच्या भीतीने मुलीला धमकावून घरी पाठवले. त्यानंतर दोन दिवसांनी मुलीच्या पोटात दुखत होते. या घटनेनंतर मुलगी भेदरलेल्या अवस्थेत राहू लागली. आठवडाभरानंतर मावशीने तिला या अवस्थेत पाहून प्रेमाने विचारपूस केली असता मुलीने अत्याचाराची माहिती दिली (७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार). पीडितेचे कुटुंबीय याचा जाब विचारण्यासाठी गेले असता पालकांनी त्याला रागवायचे सोडून पाठराखण केली. यामुळे मुलीचे कुटुंबीय चिडले. यावरून दोन्ही कुटुंबात भांडण झाले आणि प्रकरण पोलिस ठाण्यात पोचल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला.