नागभीड तालुक्यात बारावीतील विद्यार्थीचा तलावात डूबन मृत्यू |
नागभीड:- कोरोना महामारीच्या काळात देशातील सर्वच शाळांना सुट्टी असल्यामुळे अनेक विद्यार्थी गुराखी बनत आहेत. यामागचं नेमकं कारण म्हणजे शाळेला सुट्टी असल्यामुळे घरच्या कोठ्यातीळ गुरुढोरे राखण करण्याकरिता विद्यार्थी जात असल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. नागभीड तालुक्यातील अशाच घटनेमुळे एका तरुण विद्यार्थ्याचा जीव गेल्याची धक्कादायक घटना पळसगाव(खुर्द) येथे आज 4:00 वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहिती अनुसार: मृतक विद्यार्थ्याचा नाव प्रियांशू अतुल मेश्राम (वय 18 वर्ष ) हा इयत्ता 12 व्या वर्गात शिक्षण घेत होता. मात्र शाळेला सुट्टी असल्याने घरच्या म्हैस राखणं करण्यासाठी गावाजवळील जगंल परिसरात तो इतर गावातील गुराखी मुलांसोबत आज गेला. 4:00 वाजताचे सुमारास घराकडे येत असताना म्हैस तलावामध्ये घुसल्या त्याच्या मागोमाग सदर मुलगा पण पाण्यात गेला.
दरम्यान मृत्तकाला पाण्याचा अंदाज न समजल्याने तो पाण्यातच बुडू लागला. यावेळी सोबतच्या मित्रानी त्याचा वाचविण्याचा अखोर प्रयत्न केला मात्र ते त्याला वाचवू शकले नाही आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.
सदर घटनेची संपूर्ण माहिती नागभिड पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व मृत्तकाचे प्रेत पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासनिसाठी रवाना करण्यात आले.
प्रियांशु हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा असून कुटुंबातील लाडका होता. त्याच्या जाण्याने कुटुंब व गावपरिसर शोकासागरात बुडालेला आहे. घटनेचा अधिक तपास नागभिड पोलीस विभाग करित आहे.