Gadchiroli News: अत्यंत आनंदिय बातमी गडचिरोली शहरात घडण्यास आली आहे. येथील नक्षलवादी महिलाने पोलीस दलातील सिआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या महिलेचे नाव करिष्मा उर्फ गंगा उर्फ सविता अजय नरोठी (वय 20) रा. पुसगुडा छत्तीसगड असे आहे.
या संदर्भात आज पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यात सीआरपिएफ चे पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मिडलेल्या माहिती नुसार - सविता अजय नरोठी ही चातगाव दलमध्ये सदस्य पदावर कार्यरत होती, आणि तिच्यावर चकमकीचे 4 गुन्हे दाखल असूनही तिच्यावर सरकारने 2 लाख रुपयाचे बक्सीस लागू केले होते.