Suicide News: कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सूरी झाल्यापासून अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी झालं आहे. दरम्यानच्या काळात अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबला. पण यामुळे गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांमधील डिजिटल दरी स्पष्टपणे दिसून आली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेट नसल्यानं त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे.
नांदेडमधील मजुराच्या 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइलची मागणी करूनही मोबाइल न मिळल्यानं अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना नायगाव शहरातील फुलेनगर येथील असून आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव बुद्धशी प्रकाश पोटफोडे आहे. बुद्धशी सध्या अकरावीला शिकत होती. तिला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते.
आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.