Buldana News: सावरगांव माळ, सावळा व कोलारा गावासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर | Batmi Express Marathi

Buldana News: सावरगांव माळ, सावळा व कोलारा गावाला अनुक्रमे टँकरद्वारे दररोज 40 हजार 475, 31 हजार 840, 1 लक्ष 79 हजार 100 लीटर्स पाण्याच्या पुरवठा

buldhana,बुलडाणा,corona virus,कोरोना वायरस बातम्या, Hindi news, latest Hindi news, live hindi news,latest news

Buldana News:
 सिं. राजा तालुक्यातील सावरगांव माळ, बुलडाणा तालुक्यातील सावळा व चिखली तालुक्यातील कोलारा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सावरगांव माळ येथील लोकसंख्या 1920 असून सावळा येथील 797 आहे. तसेच कोलारा येथील लोकसंख्या 4995 आहे.

$ads={1}

सावरगांव माळ, सावळा व कोलारा गावाला अनुक्रमे टँकरद्वारे दररोज 40 हजार 475, 31 हजार 840, 1 लक्ष 79 हजार 100 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे.

टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, सिं.राजा व बुलडाणा यांनी कळविले आहे.

Read Also: 5 गावांची तात्पुरती पूरक नळ योजना व 3 गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजुर

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.