Raipur news live: नक्षलवाद्यांचा समूळ विनाश करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा | Batmi Express Marathi

Raipur news live: छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्तीसगडमध्ये दाखल झाले.

"raipur news live" "raipur news today live" "" "today"
अमित शहा यांनी जगदलपूरमध्ये १४ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

Raipur news live
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्तीसगडमध्ये दाखल झाले. अमित शहा यांनी जगदलपूरमध्ये १४ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबोत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठीनंतर नक्षल्यांचे समूळ विनाश करणार, असा निर्धार अमित शहा यांनी व्यक्त केला.

$ads={1}

नक्षली हल्ल्यात २२ जवान शहीद झालेत. तर राजेश्वर सिंह हा एक जवान अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे नक्षल्यांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण छत्तीसगडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर नक्षलग्रस्त भागांच्या सीमांवर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, झारखंड आणि ओडिशाला लागून असलेल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमांवर सर्चिंग वाढवण्यासह सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार आणि देशाच्या वतीने नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मी श्रद्धांजली वाहिली.नक्षल्यांविरोधात लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही, असे  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
$ads={2}
नक्षल्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहील आणि ही कारवाई आणखी मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येईल. ही लढाई आता नक्षलवाद संपवल्याशिवाय थांबणार नाही, अशी ग्वाही देशाच्या जनतेला देतो. गेल्या काही वर्षांमध्ये दुर्गम  भागात  सुरक्षा दलांनी मोठे काम केले आहे. हे नक्षल्यांच्या डोळ्यात खुपत असल्याने ते अशा प्रकारचे भ्याड हल्ले करत आहेत. नक्षल्यांविरोधातील ही लढाई आता निर्णायक वळवणार आहे, असे  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.