Gadchiroli Corona Updates: एका मृत्यूसह आज 269 नवीन कोरोना बाधित तर 72 कोरोनामुक्त; वडसा 38, आरमोरी 19,भामरागड 5 | Batmi Express Marathi

Gadchiroli Corona Deaths Updates: आज एक नवीन मृत्यूमध्ये धानोरा तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषाचा निमोनियाने मृत्यू झाला आहे.

   

Gadchiroli Corona Updates,Gadchiroli Corona News,Gadchiroli News,गड़चिरोली कोरोना अपडेट

Gadchiroli Corona Updates:
आज जिल्हयात 269 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12100 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10585 वर पोहचली. तसेच सद्या 1389 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 126 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
$ads={1}

Gadchiroli Corona Deaths Updates: आज एक नवीन मृत्यूमध्ये धानोरा तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषाचा निमोनियाने मृत्यू झाला आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.48 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 11.48 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला. Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
Gadchiroli Corona New Updates: नवीन 269 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 124, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी 19, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 11, धानोरा तालुक्यातील 24, एटापल्ली तालुक्यातील 12, कोरची तालुक्यातील 8, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 2, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 5 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 38. Read Also:  नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण

आज कोरोनामुक्त: आज कोरोनामुक्त झालेल्या 72 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 30, अहेरी 8, आरमोरी 3, भामरागड 3, चामोर्शी 4, धानोरा 7, एटापल्ली 4, सिरोंचा 1, कोरची 1, कुरखेडा 4, तसेच वडसा 7 येथील जणाचा समावेश आहे.
$ads={2}
काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील - जिल्हयातील शासकीय 68 व खाजगी 2 अशा मिळून 70 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 1125 व दुसरा डोज 214 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 44982 तर दुसरा डोज 10918 नागरिकांना देण्यात आला आहे. Read Also: Satara news corona: 16 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 8 बाधितांचा मृत्यू

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.