![]() |
नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. |
Mumbai Live: मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. त्यामुळे नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. तर जलसंपदा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
$ads={1}
दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला.
$ads={2}
यापूर्वीही विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि भाजपने घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले. यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.