Maharastra Lockdown Again: 14 एप्रिलनंतर कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय | Batmi Express Marathi

Maharastra Lockdown Again: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक संपली आहे. 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे.

Maharastra Lockdown Again,#MaharastraLockdownAgain,Maharastra News,Maharastra Lockdown NewsMaharastra Lockdown Again,#MaharastraLockdownAgain,Maharastra News,Maharastra Lockdown News

Maharastra Lockdown Again:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक संपली आहे. 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आरोग्य सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

मुख्यमंत्री म्हणाले :

कोरोना लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

तसेच रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. Read Also:  कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय; काय बंद तर काय चालू राहणार

टास्क फोर्सने दिल्या सुचना :

केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन लाऊन  तात्पुरती गरज भागवावी. 

मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे.

बैठकीत नेमकी काय चर्चा :

बैठकीत लॉकडाऊनला कसे सामोर जायचे याबाबत चर्चा झाली असून राज्यात लॉकडाऊन लावायचा झाला तर प्रत्येक विभागाची तयारी, पुढील गणिते आणि आर्थिक बाजूची माहिती घेणार आहे.

टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दाहकता किती ठेवायची? यावर चर्चा झाली. राज्यातली आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचं नियोजन किती पटीनं आणि कसं वाढवले गेले पाहिजे? यावरही बैठकीत चर्चा झाली.

एसओपी :

वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे.  

कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.