नुकताच सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. आणि तसेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली
$ads={1}
दरम्यान राज्यातील SSC दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट्पणे सांगितले आहे.
“राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. पण सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नाही,” असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.