कोविड उपचार केंद्रांना भेट |
पथकाने अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण प्रक्रिया व स्टाफबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी वलगाव येथील कोविड केअर सेंटर आणि अचलपूर येथील कुटीर रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. कोरोना उपचारांबाबत व उपलब्ध साधनसामग्रीबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. Read Also: Satara news corona: 16 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 8 बाधितांचा मृत्यू
पथकाने त्यानंतर देवमाळी येथील कंटेनमेंट झोनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता त्रिसूत्रीचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देश पथकाने यंत्रणेला दिले.