Breaking News: हाफकिन संस्थेस लस उत्पादित करण्यास प्रशासनाकडून मान्यता !

Breaking News: हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने .....
Breaking News: हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली

वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी दिला आहे. 
सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे. Read Also: Telangana Board Exam 2021:TS SSC Class 10 exams cancelled, TS Inter Class 12 exams postponed

तसेच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असे मुख्य सचिव कुंटे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हंटले.
दरम्यान, प्रकल्पावर देखरेखीसाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.