Gudipadwa! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त शोधत असाल तर आपण योग्य पेजवर आला आहात...

Gudipadwa: 13 एप्रिल 2021 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवरच गुढीपाडवा का साजरा केला जातो?

gudipadwa, Happy Marathi, New Year, Gudipadva

Gudipadwa:
 चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवसाकडे अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्याची साग्रसंगीत पूजा केली जाते. खरं तर या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करणं, दाराला तोरण लावून पूजा विधीसह घरोघरी गुढी उभारली जाते. तर गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जाते. Read Also: Nagpur Live: जिवंत असलेले महिलेचे दिले मृत्यु प्रमाणपत्र व मृतदेह दुसऱ्याचा दिला 

तर या वर्षी 13 एप्रिल 2021 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवरच गुढीपाडवा का साजरा केला जातो? तसेच गुढीची पुजा आणि तिथी आणि शुभ मुहूर्त याबाबत आपण जाणून घेउयात.

$ads={1}

का साजरा केला जातो गुढीपाडवा? : 

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. गुढीवर कडुनिंबाची दहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारतात. Read Also: सिंदेवाही तालुक्यात पाण्याचे 19 एटीएम लागणार....

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? : 

गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते.  Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली

गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त : 

● गुढीपाडव्याचा उत्सव : 13 एप्रिल 2021

● प्रतिपदा तिथीची सुरुवात : 12 एप्रिल 2021 ला रात्री 8 वाजता. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.