लग्न समारंभाचे आयोजन करणाऱ्या लोकांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल |
Gondia Live: शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भीमघाट स्मारक समिती ग्राऊंड चुलोद रोड , गोंदिया येथे एप्रिल रोजी दुपारी १.४५ वाजता लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्या लग्नात २०० वहाडी असल्याने या लग्न समारंभाचे आयोजन करणाऱ्या लोकांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्यात तीन घटनांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
$ads={1}
संसर्गजन्य कोरोना रोगाची लागण होत आहे. यासाठी गर्दी करू नये, असे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले असतानाही भीमघाट स्मारक समिती ग्राऊंडवर आयोजित लग्न समारंभात २०० व्हराडी लोक होते. त्यांनी मास्कचा वापर केला नाही किंवा शारीरिक अंतर ठेवले नव्हते. त्यामुळे गोंदिया शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. लग्न समारंभ आयोजन करणान्यांवर भादंविच्या कलम १८८,२६ ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीसनायक मानपीट करत आहेत.
मिनी लॉकडाऊन :
महाराष्ट्र शासनाच्या नव्या मिनी लॉक डाऊन अनुसार लग्न समारोह मध्ये केवळ ५० वऱ्हांड्याची परगावानी दिली आहे. आणि कोरोना विषाणूची लागणं होऊ नये म्हणून मास्क आणि सॅनिटीजर चा वापर करण्यात यावे असे आदेश सुद्धा प्रशानाकडून देण्यात आले आहे.
$ads={2}
वहाड्यांची गर्दी , गुन्हा दाखल:
चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वासनी येथील एका लग्नात ४ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता गर्दी करण्यात आली . या लग्न समारंभात कोरोना ठाण्यांतर्गत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही ग्राऊंड त्यामुळे चिचगड पोलीस संदीप मुरलीधर तुलावी ( ३५ ) यांच्या तक्रारीवरून चिचगड रोजी पोलिसांनी भादविच्या कलम १८८.२६ ९ .२७० अन्वये गुन्हा दाखल केला आहे .