![]() |
256 नवे बाधितासह 1259 रूग्ण क्रियाशिल |
Gondia Corona Live - राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली आहे. या अनुसंगाने राज्य शासनाने प्रशासनाला अल्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातच गोदिया जिल्ह्यातही बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत चालली आहे. संसर्ग वाढत असल्याने सावधगिरी बाळगून सुरक्षित राहण्याची गरज आहे. मागील 10 दिवसात तब्बल 1450 बाधित रूग्णांची मर पडली आहे. यामुळे दिवसेंदिवस संसर्गाच्या अनुसंगाने गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक होवू लागली आहे. यामुले , नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.
$ads={1}
मागील महिनामराषासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. नागपूर बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला व मुंबई या सारख्या महानगरात संसर्ग वाढीमुळे राज्य शासनाने सतर्कतेचा पवित्रा अवलंबिला. दरम्यान राज्य शासनाकडून सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सुचनाही करण्यात आल्या. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाची दुसरी लाट सर्वच जिल्ह्यात पहावयास मिळू लागली आहे.
Read Also: आज ऑनलाइन डाउनलोड कर पाएंगे एचएससी की हॉलटिकिट, डाउनलोड लिंक यहाँ
गोंदिया जिल्ह्यात ही मारगील 15 दिवसांपासून कोरोना आधितांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत चालली आहे. दोन अंकी बाधितांची संख्या आता तीन अंकी झाली आहे. यामुळे दिवसेंदिवरा जिक्ह्याता संसरगच्या अनुसंगाने चिंतेचे वातावरण निर्माण झाल आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून गर्दी टाळणे, मास्क बापरणे, सॅनिटायझर चा उपयोग करणे, अंतर पाळणे आदि सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या सुचनांकडे होत असलेले दुर्लक्ष संसर्ग बाडीला वाव देत आहेत.
$ads={2}
यामुळेच जिल्यातही बाधिवाचा आलेख झपाऊ्या ने वाटा चालला आहे. मागील दहा दिवसात जिल्ह्यात तब्बल 1450 बाधितांची भर पडली आहे. 24 मार्च रोजी जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 15242 एवढी होती. हि आकडेवारी आजघड़ीला 16692 वर पोहचली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळ गून नागरिकानी सुरक्षित राहण्याची गरज आहे.
आजचे कोरोना बाधित: जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आज 256 नव्या रूग्णांनी नोंद झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील 164, तिरोडा-30, गोरेगाव-05, आमगाव-05, सालेकसा- 05, देवरी - 09, सडक अर्जुनी-07, अर्जुनी मोरगाव-30 व इतर जिल्ह्यातील एका रूग्णाचासमावेश आहे.
$ads={2}
256 नवे बाधितासह 1259 रूग्ण क्रियाशिल: जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे दररोज रूग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. आज (ता. 3) जिल्ह्यात 256 नवे बाधितांची नोंद झाली आहे. तर 50 रुग्णांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला क्रियाशिल रूग्णाची संख्या 1259 एवढी झाली आहे. यातील 882 रूग्ण सौम्य लक्षणाचे असल्याने त्यांना गृहअलगीकरणात सल्ला देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 16692 एवढी असून यातील 15241 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा प्रयोगशाळेकडे 683 नमुन्यांचाहवाल प्रलंबित आहे.