Gadchiroli Live: दुर्दैवी भावाला बघता आलं नाही बहिणीचं लग्न, पत्रिका वाटायला गेला अन परत येत असतांना अपघाती मृत्यू | Batmi Express Marathi

बहिणीचे लग्न असल्यामुळे भाऊ अत्यंत खुश होऊन लग्नाच्या तयारीला लागला. चुलत भावांना घेऊन पत्रिका वाटायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं.

gadchiroli latest news, gadchiroli live news, gadchiroli marathi news, gadchiroli newsलग्न, स्वप्न, ऊस, पाऊस, अपघात, बेळगाव

कोरची :
तालुका मुख्यलयापासून २ किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील युवक बहिणीचे लग्न १४ एप्रिल ला असतांना बहिणीच्या लग्नाचे पत्रिका वाटप करुन परत येत असतांना बेळगांव-झनकारगोंदी फाट्यावर दुचाकीचा तोल जाऊन अपघात झाला यात युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवर असलेल्या इतर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. Read Also: महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता? मंत्री विजय वडेट्टीवारांचे जनतेला संकेत
$ads={1}
पवन केजाराम देवांगना (२५) असे अपघातात जागीच मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे तर प्रमोद करंगसू देवांगना (२४) व जागेश्वर पंचराम देवांगन (१९) असे गंभीर जखमी असलेल्या सहकाऱ्यांचे नावे आहेत, तिघेही रा. कोचीनारायेथील रहिवासी आहे. गंभीर जखमी वर ग्रामीण रुग्णालय कोरची येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचार करण्यासाठी गडचिरोली येथे हलविण्याची कार्यवाही वृत लिहेपर्यंत सुरू होती.

अठरा विश्वेश्वर दारिद्र्य असलेला एकुलता एक सुशिक्षित मुलगा पवन देवांगन हा मिळेल ते काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. जाती व्यवसायाला बगल देऊन ईटियाडोह, नवेगाव बांध व मिळेल त्या ठिकाणाहून मच्छी विकत घेवून तालुक्यातील गावातील बाजारात विकायला जात असे. Read Also: कोरोना कहर सुरूच नागपुरात 6498 नवीन घटना, 64 मृत्यू
$ads={2}
केजाराम देवांगन यांच्या तीन मुलीनंतर जन्माला आलेला पवन हा मुलगा, सुशिक्षित बेरोजगार असून मेहनती होता. आपल्या चुलत भावांना घेऊन बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन परत येत असतांना काळाने झडप घातली व अपघाती निधन झाले. सदर घटनेचा अधिक तपास कोरची पोलीस करीत आहे. Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.