![]() |
Coronavirus in Gadchiroli (Representative image) |
Gadchiroli Corona Updates: गडचिरोली एप्रिल महिण्यास प्रारंभ होताच कोरोनाबळींचा सिलसिला सुरू झाला असुन काल दोन कोरोनाबळी गेल्यानंतर आज आणखी कोरोनाने दोघांचा बळी घेतला. यामुळे आतापर्यंत कोरोनाबळी गेलेल्यांची संख्या 115 झाली आहे दोन नवीन मृत्यूमध्ये आलापल्ली येथील 60 वर्षीय महि लेचा तर दुसऱ्या मृत व्यक्तिमध्ये गडचिरोली येथील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
$ads={1}
दरम्यान आज 111 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 68 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित 10977 पैकी कोरोनामुक्त झालेल्या सग्णांची संख्या 10268 झाली आहे. तसेच सद्या 576 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
Read Also: गोंदिया जिल्हा कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट तर आज कोरोना बाधितांचे त्रिशतक पूर्ण
जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.71 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.25 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.
$ads={2}
नवीन 111 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 46, अहेरी 10, आरमोरी 02, भामरागड तालुक्यातील 20, चामोर्शी 8, धानोरा तालुक्यातील 01, कोरची 02, कुरखेडा 03, मुलचेरा 01,सिरोंचा 03 तर देसाईगंज तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 68 रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 42 अहेरी 8, आरमोरी 04, भामरागड 01, चामोर्शी 03, धानोरा 01, एटापल्ली 01, सिरोचा 01, कुरखेडा 03 तर देसाईगंज तालुक्यातील 04 जगांचा समावेश आहे.