![]() |
ज्वारीच्या कणसाच्या गुच्छाने केले शेतकऱ्यांनी स्वागत |
Gadchiroli Live News: जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत शेतकऱ्यांनी ज्वारीच्या कणसाने तयार केलेल्या गुच्छाने केले. आकांक्षित जिल्हा निधीतून केंद्रपुरस्कृत असलेल्या योजनेमधून जिल्ह्यात वाटप करण्यात येणाऱ्या 24 ट्रॅक्टर पैकी प्राथनिधिक स्वरूपात दोन ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यासाठी पालकमंत्री उपस्थित होते. जिल्ह्यात आकांक्षीत जिल्हा निधीतून मिळालेल्या निधीतून प्रत्येक तालुक्याला दोन याप्रमाणे जिल्ह्यात 24 ट्रॅक्टर साठी लॉटरी पद्धतीने गटांची निवड करण्यात आली. या मधील दोन ट्रॅक्टरच्या गटातील शेतकरी सदस्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आवर्जून पालकमंत्र्यांसाठी ज्वारीच्या कणसा पासून तयार केलेले गुच्छ भेट म्हणून दिले.
$ads={1}
मागील वर्षी रब्बी हंगामात बाराशे हेक्टरवर रब्बी ज्वारी चे प्रात्यक्षिक प्रथमच घेण्यात आले. या वर्षीही उत्पादित बियाणे रब्बी हंगामात वापरून ज्वारीचे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पालकमंत्री यांना जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे यांनी यावेळी दिली.
मत्स्य शेती, स्ट्रॉबेरी व जांभूळ या प्रकल्पांकडे लक्ष वेधले : जिल्हयात शेतीमध्ये आधुनिक शेती करण्याकडे कल वाढीला लागला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी बैठकित केले. त्यांनी स्वत:हून मत्स्य शेतीला चालना देण्याबाबत सूचना केल्या. तसेच सद्या मुलचेरा तालुक्यातील नव्याने लागण केलेल्या 1500 स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले जर जिल्हयात उत्पादन चांगल्या प्रकारे येत आहे तर निश्चितच त्याची लागवड मोठया प्रमाणात होवू शकते. यापुढे ते असे म्हणाले की माझ्या जिल्हयातून यासाठी रोपे व इतर तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी शेतकरी जोडून देता येतील.
तसेच जिल्हयात उत्पादन वाढल्यास निश्चितच आपल्याला प्रक्रिया उद्योगही उभारता येईल. जांभूळ व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना विक्रिसाठी नागपूर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेती विभागाच्या आखलेल्या नियोजनाची प्रसंशा त्यांनी यावेळी केली. या बैठकीवेळी कृषी विभागामार्फत केंद्र पुरस्कृत आकांक्षित जिल्हा निधीमधून देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरचे वाटप पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्फत करण्यात आले.