Amravati News Live: कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’ न ठेवल्यास तिस-या लाटेचा धोका - केंद्रिय पथकाचा इशारा | Batmi Express Marathi

Amravati News Live: कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’ न ठेवल्यास तिस-या लाटेचा धोका - केंद्रिय पथकाचा इशारा केंद्रिय आरोग्य पथकाकडून जिल्हा कोविड रुग्णालय

Amravati News Live, Amravati News In Marathi,Amravati News,Amravati Latest News

Amravati News Live:
कोरोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’चे पालन होणे आवश्यक आहे. त्याचे पालन न झाल्यास तिस-या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सगळीकडे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता या नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश केंद्रिय आरोग्य पथकाने आज येथे दिले.

$ads={1}

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने आज सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थित जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा या पथकात समावेश आहे. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाकडून कोरोना उपाययोजनांबाबत बैठकीद्वारे माहिती घेतली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा, पालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सादरीकरण केले.
कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. नागरिकांकडून कोविड ॲप्रोपिएट बिहेवियरचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मास्क हे कोरोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे. दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात. दक्षता त्रिसूत्री ही जीवनशैलीचा भाग व्हावी. प्रशासन व आरोग्य यंत्रणा सांघिक भावनेतून कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहे. असेच टीमवर्क ठेवावे, असे निर्देश पथकाने दिले.
$ads={2}
यावेळी जिल्हाधिका-यांनी कोरोना उपाययोजनांत कार्यान्वित झालेली रुग्णालये, विलगीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील व्यवस्था, ऑक्सिजन व्यवस्था, लसीकरण आदी विविध बाबींची माहिती पथकाला दिली. पथकाने जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्टाफशी चर्चा केली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी भूषण व त्यांच्या सहका-यांकडून त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पथकाने समता कॉलनीतील कंटेनमेंट झोनला भेट देऊन पाहणी केली, तसेच महापालिकेच्या सुदामकाका देशमुख सभागृह स्थित गृह विलगीकरण नियंत्रण कक्षालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकारी- कर्मचा-यांकडून माहिती जाणून घेतली.
लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील यंत्रणा आदींचीही पाहणी पथकांकडून होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.