![]() |
दुय्यम निबंधक कार्यालयाचे आवाहन |
$ads={1}
सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्याने व जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने दुय्यतम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणाऱ्या पक्षकार यांचेकडे कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य आहे. सदर रिपोर्ट पक्षकार उपलब्ध करून देणार नसतील, अशा पक्षकारांना कार्यालयात प्रवेश मनाई राहील. सदरची कार्यवाही 12 एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे.
$ads={2}
तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी कोविड 19 चा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल आणावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.