Coronavirus Outbreak Buldana: प्राप्त 4748 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 1022 पॉझिटिव्ह | Batmi Express

Coronavirus Outbreak Buldana: ​प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5770 अहवाल प्राप्त झाल
buldhana,बुलडाणा,corona virus,कोरोना वायरस बातम्या, Hindi news, latest Hindi news, live hindi news,latest news

Coronavirus Outbreak Buldana: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5770 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4748 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1022 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये 699 प्रयोगशाळेतील व रॅपीड टेस्टमधील 323 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 672 तर रॅपिड टेस्टमधील 4076 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4748 अहवाल निगेटीव्ह आहेत.

$ads={1}

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व तालुका : 238, खामगांव शहर व तालुका : 144, शेगांव शहर व तालुका : 4, दे. राजा तालुका व शहर : 57, चिखली शहर व तालुका : 108, मेहकर शहर व तालुका : 81, मलकापूर शहर व तालुका : 134, नांदुरा शहर व तालुका : 70, लोणार शहर व तालुका : 28, मोताळा शहर व तालुका :23, जळगांव जामोद शहर व तालुका : 73, सिं. राजा शहर व तालुका : 49 आणि संग्रामपूर शहर व तालुका : 13 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 1022 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 70 वर्षीय महिला, महावीर नगर, बुलडाणा येथील 70 वर्षीय महिला, देऊळघाट ता. बुलडाणा येथील 75 वर्षीय महिला, गोंधनपुर ता. खामगांव येथील 79 वर्षीय महिला, रेखा प्लॉट, खामगांव येथील 71 वर्षीय महिला व वाडी, खामगांव येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 945 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सेच आजपर्यंत 237308 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 34736 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 34736 आहे.
$ads={2}
आज रोजी 3514 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 237308 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 41070 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 34736 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 6052 रूग्णालयात कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 282 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.