Amravati News Live: कोरोना प्रतिबंधक उपाययोजना ऑक्सिजन पुरवठ्याच्या संनियंत्रणासाठी समिती गठित जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

Amravati News Live: राज्य शासनाने वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक केला आहे.

Amravati News Live, Amravati News In Marathi,Amravati News,Amravati Latest News
कोरोनाबाधितांवर उपचार करणारी कोविड रूग्णालये

Amravati News Live: जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करणारी कोविड रूग्णालये, नॉनकोविड रुग्णालये व कोविड केअर सेंटर याठिकाणी ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होण्याच्या दृष्टीने संनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तसा आदेश जारी केला.

$ads={1}

राज्य शासनाने वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक केला आहे. आरोग्य विभागाने या संदर्भातील अधिसूचना काढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याच्या संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावरही समिती गठित करण्यात आली आहे. अन्न व औषधे प्रशासनाचे सहायक आयुक्त, तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
या समितीने अमरावतीच्या वल्लभ गॅसेस व अन्य ऑक्सिजन वितरकांनी संपर्क ठेवावा, तसेच रुग्ण व रुग्णालयांची परिस्थिती पाहून वितरण नियमित ठेवावे. जिल्ह्यात कुठेही अनावश्यक वितरण होऊ नये.
$ads={2}
वल्लभ गॅसेस यांनीही समितीशी समन्वय ठेवून वितरण करावे. समितीने सोपविण्यात आलेल्या कामकाजानुसार कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.