
Maharashtra Corona Cases: राज्यात आज दिवसभरात तब्बल 63 हजार 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तसेच राज्यात 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 34 हजार 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यात आत्तापर्यंत 27 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून राज्याचा रिकव्हरी रेट 81.65 टक्के एवढा झाला आहे.
$ads={2}
सध्या राज्यात 31,75,585 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25, 694 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. Read Also: 14 एप्रिलनंतर कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय
दरम्यान, राज्यात आज 349 जणांचा मृत्यू झाला असून सध्या राज्याचा मृत्यूदर 1. 7% एवढा आहे.