Satara News Corona: शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा शासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहणार असून नागरिकांनी वैध कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही तरी नागरिकांनी वैध कारण असल्यासच घराबाहेर पडावे,असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
रेस्टॉरंट व बारमध्ये सोमवार ते शुक्रवार पार्सल सेवा सुरु होती मात्र, शनिवारी व रविवारी ही पार्सल सेवा घ्यायला नागरिकांना बाहेर पडता येणार नाही परंतु रेस्टॉरंट व बार यांना घरपोच सेवा देता येऊ शकते. ई-कॉमर्स, शेती संबंधित कामे यांना बंधने नाहीत. लग्न समारंभासाठी तहसीलदार याची परवानगी घ्यावी. 50 पेक्षा जास्त लोकांनी लग्न समारंभास उपस्थित राहू नये. कोणी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याचे ग्रामीण भागातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. ज्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून सामाजिक संस्थांनी यासाठी मदत करावी. Read Also: नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद आहेत, अशा दुकानदांरानी यापुर्वी जसे सहकार्य केले होते त्याचप्रमाणे यावेळी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा वापर प्रोटॉकॉलप्रमाणेच करावा.
रेमडेसिवीरचा औषध हे कोरोना संसर्ग रुग्णाच्या नातेवाईकांच्या दबावाखाली दिले जात आहे. तसे न करता डॉक्टरांनी प्रोटॉकॉलप्रमाणे रेमडेसिवीरचे औषध द्यावे. जिल्ह्याला रेडिमसनचा पुरवठा 100 टक्के होईल व रुग्णांना सहजरित्या उपलब्ध होईल यासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या माध्यतातून प्रयत्न करीत आहोत. रेमडेसिवीरच्या औषधाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये. गरज असेल तर कोरोना संसर्ग रुग्णास डॉक्टर रेमडेसिवीरच औषध देतील. रेमडेसिवीरच्या औषधासाठी लवकरच कक्ष स्थापन करुन या कक्षाच्या माध्यमातून निरासण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह सांगितले आहे. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी