Satara Live: केंद्रीय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला उपयुक्त अशा सूचना केल्या. या केंद्रीय पथकामध्ये डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन हे होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये व्हेंटेलेटरीची संख्या वाढवावी तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती जनतेला व्हावी यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पीटलच्या बाहेर बेड उपलब्धतेची माहिती रोजच्या रोज अपडेट करावी. जो भाग कटेन्मेंट जाहीर केला आहे अशा भागात केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रभावी अमंलबजावणी करावी. कोरोना संसर्ग रुग्णाच्या जे-जे संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांची तातडीने कोरोना टेस्टींग करावे, यासह विविध सुचना केंद्रीय पथकातील डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या. Read Also: कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय; काय बंद तर काय चालू राहणार
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन सुविधा वाढण्यावर भर देत असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.