$ads={1}
दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. Read Also: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली
त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे.केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर CBSE परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे.
$ads={2}
मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता 1 जून रोजी CBSE कडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.