Buldana News: नांदुरा तालुक्यातील पोटा हे गाव आज, 12 एप्रिलला महास्फोटाने हादरले आहे. यामुळे तब्बल 77 जण ‘घायाळ’ झाले आहेत. परिणामी संपूर्ण गाव ‘सिल’ करण्यात आले आहे. हा स्फोट एखाद्या स्फोटकाचा नव्हता तर तो होता कोरोनाचा! आता या चिमुकल्या गावात कोरोनाचा स्फोट अचानक कसा झाला, असा धक्कादायक सवाल कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. Read Also: 1539 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 341 पॉझिटिव्ह • 863 रूग्णांना मिळाली सुट्टी
$ads={1}
तर त्याचे झाले असे, की कोरोनाचा धोका रोखण्यासाठी तहसील, आरोग्य विभाग व अन्य यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.त्याचा एक भाग म्हणून पोटा गावात आज कोरोनविषयक तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी 145 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. Read Also: Nagpur Live: जिवंत असलेले महिलेचे दिले मृत्यु प्रमाणपत्र व मृतदेह दुसऱ्याचा दिला
पैकी दहा, पंधरा नव्हे तब्बल 77 गावकरी कोरोना पॉझिटिव्ह निघाले! या कोरोना महास्फोटाने हे गावच नव्हे तर पंचक्रोशीतील गावेही हादरली! या स्फोटानंतर संपूर्ण पोटा गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली