Bramhapuri Live: विकासकामांना मागणीप्रमाणे पुर्ण निधी देणार | Batmi Express Marathi

Bramhapuri Live: विकासकामांना मागणीप्रमाणे पुर्ण निधी देणार; ब्रम्हपुरी तालुका आढावासभेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

Bramhapuri Live,Bramhapuri Live Today,Bramhapuri News,Chandrapur Live
ब्रम्हपुरी तालुका आढावासभेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

Bramhapuri Live:
ब्रम्हपुरी शहराचा विकास होऊन शहर स्वच्छ व सुंदर व्हावे म्हणून यंत्रणेद्वारे ज्या-ज्या विकास कामांकरिता निधीची मागणी केली जाईल, त्या सर्व कामांना निधीं उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे दिले.

नुकतेच ब्रम्हपुरी येथे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी पालकमंत्री यांनी सर्वप्रथम कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. ऑक्सीजन पाईपलाईन व 25 ऑक्सीजन बेड तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.
$ads={2}
कोरोना सदृष लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तातडीने रूग्णालयात भरती करूण घ्यावे तसेच ऑक्सीजनचा तुटवडा पडू नये यासाठी उपाययोजना करून ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी मनरेगा, नगरपरिषद, कृषी विभाग, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना इ. बाबत यावेळी आढावा घेतला. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.