Bramhapuri Live: लग्न सोहळा पार पडला; वरात घेऊन निघताच नवरदेवाचा मृत्यू | Batmi Express Marathi

Bramhapuri Live: ब्रम्हपुरी वरून आरमोरी ला नेत असतानाच रस्त्यातच त्यानं अखेर श्वास सोडून दिल आणि त्यांचा मृत्यू झाला.

Bramhapuri Live,नवरदेवाचा मृत्यू,निघताच नवरदेवाचा मृत्यू,Bramhapuri Live Today,Bramhapuri News,Chandrapur Live

Bramhapuri Live:
 
लग्न म्हणजे सात जन्माची एक बंधनाची गाठ होय.खार तर या बंधनात सामाजिक चालीरीती नुसार माणूस विवाह या बंधनात बांधल्या जाऊन संसार रुपी गाडा चालवतो. कधीकधी निसर्गनियमानुसार पती-पत्नी दोघेही एकमेकांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ देतात असतात. तर कोणी हा साथ मधेच सॊडून जातात. अशीच एक अत्यंत दुःखद घटना आवळगाव येथील जनतेनी यापूर्वी कधी डोळ्याने बघितलेली नसेल ती काल पहावयास, ऐकावयास मिळाली. मन सुन्न करणारी अशी हि घटना घडली.

$ads={1}

चंद्रपूर जिल्ह्यातील सिदेंवाही तालुक्यातील गडबोरी वासेरा येथील वर श्री नाजूक अभिमन्यू पोहनकर हे आवळगाव ला मोठ्या हौसेने वर बनून आले होते. कु. दिपाली दिलीप मेश्राम हिच्याशी शासकीय नियमाला अनुसरून २५ ते ३० लोकांच्या उपस्थितीत आनंदात लग्न सोहळा सकाळी ठीक साडेअकरा वाजताच्या सुमारास पार पडला. मात्र लग्न सोहळा पार पडल्यानंतर दुपारी ठीक तीन वाजता च्या दरम्यान रितीरिवाजानुसार वर आपल्या वधूला स्व-गावी नेण्यासाठी वधू सह मोटारीत बसला असता अचानक त्यांची प्रकृती बिघडली असं सांगण्यात आलं आहे.

$ads={1}

श्री नाजूक अभिमन्यू पोहनकर यांना उपचारासाठी जवळील ब्रम्हपुरी तालुक्यात नेले होते. परंतु तेथील हॉस्पिटल मधील डॉक्टरने त्यांना आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात-लवकर हलविण्यात साठी सांगितले होते. मात्र ब्रम्हपुरी वरून आरमोरी ला नेत असतानाच रस्त्यातच त्यानं अखेर श्वास सोडून दिल आणि त्यांचा मृत्यू झाला. कु. दिपाली दिलीप मेश्राम हिने संसाराचे जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नाचा संपूर्ण चकनाचूर झाला. दिपाली च्या अंगाची हळद ओलीची ओलीच राहिली. आणि तिच्या पतीने आयुष्यभराची साथ सोडली. आणि ह्या घटनेमुळे खरोखरच दोन्ही कुटुंबियांना अमृतापेक्षाही मौलाचे अश्रू एकाच वेळेस आलंय ! 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.