Bhandara Live: भंडारा जिल्ह्यात वैनगंगा कोविड सेंटर सुरू, जाणून घ्या?

Bhandara Live: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व उपचाराविना राहू नये.

Bhandara Live:
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व उपचाराविना राहू नये, या उदात्त हेतूने खा. सुनील मेंढे यांनी “समाज जागृती प्रतिष्ठान" व “आयएमए" भंडारा यांच्या माध्यमाने वैनगंगा कोविड सेंटर म्हणजे कोरोना रुग्णालय सुरु केले. 

शहरातील लक्ष्मी सभागृहात या कोविड सेंटरमध्ये खा. सुनील मेंढे आणि जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णसेवेला सुरुवात करण्यात आली.

रुग्णालयात खाटा मिळणे कठीण झाले आहे. उपचारा अभावी कुणालाही जीव गमवावा लागू नये, म्हणून खा. सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला.

“वैनगंगा कोविड सेंटर" या नावाने ५० खाटांचे रुग्णालय दलाल यांच्या मालकीच्या लक्ष्मी सभागृहात सुरु करण्यात आले. रुग्णांसाठी ऑक्सिजन पूरवठ्याची व्यवस्था असलेल्या खाटा उपलब्ध आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.