Bhandara Live: पिंडकेपार येथे भीषण पाणीटंचाई; प्रशासनाचे दुर्लक्ष !

Bhandara Live: तालुक्यातील एकोडी जवळील पिंडकेपार येथील पाणी समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
Bhandara Live: तालुक्यातील एकोडी जवळील पिंडकेपार येथील पाणी समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल च्या खोदकामामुळे व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. 

त्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. याची चाहूल आता मार्च महिन्यातच लागली आहे, त्यामुळे महिलांना पाण्याची खूप मेहनत करावी लागत आहे.

ही समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करून गावातील नळ योजना सुरू करावी व घरोघरी जोडणी करून द्यावे पाण्याच्या दोन टाके असून त्या शोभेच्या वस्तू असल्याचे दिसून येते त्याचा काहीही उपयोग नाही.

 केंद्र सरकारच्या जलशक्ति मिशन अंतर्गत सर्व गावांना नळाद्वारे पाण्याची सोय करण्याची योजना आखली जात आहे त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

याकरिता बिकट होणारी पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रेरणा ग्रामसंघ अध्यक्षा ममता भुजाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला नवीन नळ योजना सुरू करून घरोघरी पाण्याची व्यवस्था करण्याबाबतच्या पत्र दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.