Buldana News: 5 गावांची तात्पुरती पूरक नळ योजना व 3 गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजुर | Batmi Express Marathi

Buldana News: 5 गावांची तात्पुरती पूरक नळ योजना व 3 गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजुर

buldhana,बुलडाणा,corona virus,कोरोना वायरस बातम्या, Hindi news, latest Hindi news, live hindi news,latest news

Buldana News: 
जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2020-2021 मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेड राजा, चिखली, खामगांव व मोताळा तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळ येाजना व नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे.

$ads={1}

चिखली तालुक्यातील मेरा बु, खामगांव तालुक्यातील पाळा, मोताळा तालुक्यातील राजूर व सिं. राजा तालुक्यातील खैरव, सायाळा या गावांसाठी पाणी टंचाई निवारणार्थ नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजुर करण्यात आली आहे. तसेच सिं. राजा तालुक्यातील लिंगा, आंबेवाडी व दरेगांव येथे नळ योजनांची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे.

मंजूर तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर तात्पुरती पूरक नळ योजना किमान 3 वर्षासाठी कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई विभागाने कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.