Amravati News Live: म्युकरमायकॉसिस आजाराच्या चार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; जिल्हा सामान्य रुग्णालयाची कामगिरी तत्काळ उपचार झाल्यास रुग्ण पूर्ण बरा होत...

Amravati News Live: म्युकर मॉयकासिस हा एक प्रकारचा दुर्मिळ फंगल इन्‍फेक्शनचा आजार आहे.

Amravati News Live, Amravati News In Marathi,Amravati News,Amravati Latest News

Amravati News Live: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आजारातून बरे झाल्यावर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकॉसिस या दुर्मिळ आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. म्युकर मॉयकासिस हा एक प्रकारचा दुर्मिळ फंगल इन्फेक्शनचा आजार आहे. हा आजार मुख्यत: तोंडातील जबड्यात, नाकात व डोळ्यात आढळून आला आहे. Read Also: Nagpur Live: जिवंत असलेले महिलेचे दिले मृत्यु प्रमाणपत्र व मृतदेह दुसऱ्याचा दिला 

जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराने ग्रस्त चार रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन रुग्णांचा जीव वाचविण्याचे उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. श्रीकांत महल्ले यांनी एन्डोस्कोपीच्या माध्यमातून केली असून भूलतज्ज्ञ डॉ. संजय खेरडे, डॉ. बागवाले, डॉ. स्वाती बाहेकर, डॉ. के. जी. देशमुख, डॉ. सुजीत गांगोरे हे त्यांच्या टिममध्ये सहभागी होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारावर औषधोपचार सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील गोर गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी आज सांगितले.

म्युकरमॉयकासिस या आजारावर उपचार पध्दती ही खर्चीच आहे. कोविडग्रस्त तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराची लवकर लागण होऊ शकते. मधुमेहाचे रुग्ण, किमोथेरपीचे रुग्ण व प्रत्यारोपणाच्या रुग्णांमध्ये हा आजार अत्यल्प प्रमाणात आढळतो. यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी शुगर लेवल नियंत्रणात ठेवणे फार आवश्यक आहे.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोविड-19 चे लसीकरण करणे आवश्यक आहे. या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर हा 40 टक्के आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कुटुंबात अशा पध्दतीचे फंगल इन्फेक्शन शरिरात आढळून आल्यास तत्काळ नाक, कान, घसा व दंतरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन औषधोपचार करावा. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकरमॉयकासिस या आजारावर औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही रुग्णालय प्रशासनाने केले आहे. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली

आजाराची लक्षणे :

रुग्णांना डोकेदुखीचा त्रास, दृष्टी कमी होणे या डोळ्यांच्या आजारासह सायनस, तोंडातील वरच्या जबड्यात दुखणे व दातात पस होऊन दात हलणे, नाकामधून रक्तमिश्रित पस येणे, नाक बंद होणे आदी म्युकरमॉयकासिस आजाराची लक्षणे आहेत.
इन्फेक्शन तोंडावाटे आणि नाकावाटे होत असल्याचे डॉक्टरांना आढळून आले आहे. म्युकरमॉयकासिस हे फंगल इन्फेक्शन नाकावाटे व तोंडावाटे रुग्णाच्या शरिरात शिरते. म्युकरमॉयकासिस आजारात सायनसमध्ये तसेच डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होऊन त्याची तिव्रता मेंदूपर्यंत पोहोचते. फंगल हा रक्तवाहिन्यांच्या किंवा मज्जातंतूमधून आत शिरुन रक्तवाहिनीला ब्लॉक करतो व तेथील पेशींचा नाश करतो. यामुळे रुग्णाच्या डोळ्याची दृष्टी जाऊ शकते तसेच पॅरालिसिसही होऊ शकतो. नागरिकांनी या आजाराचे लक्षणे दिसल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्टराकडून तपासणी करुन आरोग्य उपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेव्दारे करण्यात आले आहे. Read Also: सिंदेवाही तालुक्यात पाण्याचे 19 एटीएम लागणार....

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.