![]() |
अॅटालिक जीम व न्यू यंग या दोन जीमवर कारवाई करण्यात आली |
भंडारा जिल्ह्यात सायंकाळी सात वाजेनंतर सुरू असल्याने शहरातील गणेशपूर व मोहाडी रोडवर असलेल्या दोन जीमवर उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड व तहसीलदार अक्षय पोयाम यांनी कारवाई केली आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लघन केल्यामुळे व मास्क न वापरल्यामुळे या जीमवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
$ads={1}
Read Also: भंडारा जिले में आज, 4 की मौत के साथ, 846 नए कोरोना संक्रमित और 218 कोरोना मुक्त पाए गए
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी भंडारा शहरातील अॅटालिक जीम व न्यू यंग जीमला काल अचानक भेट दिली असता सायंकाळी उशिरा पर्यंत जीम सुरु असल्याचे निदर्शनास आले त्याच प्रमाणे अनेक लोक बिना मास्क आढळून आले.
$ads={2}
अॅटालिक जीम व न्यू यंग या दोन जीमवर कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणे यासाठी अंटालिक जीमला 5900 तर न्यू यंग जीमला 5000 दंड आकरण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी यांनी केली.